हिच्या मिठीत तुझी ऊब (अल्बम: तरिही ) - कवी सौमित्र  

Posted by Sachin T Sawant in

मूळ अल्बम मधील कविता ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.
हिच्या मिठीत तुझी ऊब  (अल्बम: तरिही ) - कवी सौमित्र

एक ” श्रीरंग ” उरला...  

Posted by Sachin T Sawant in



राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला?
सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला ?


राधे, कुंतल रेशमी..सैरभैर गं कशाने?
उधळले माधवाने किंवा नुसत्या वारयाने?


राधे, नुरले कशाने तुज वस्त्रांचेही भान?
निळा प्रणय अथवा एका बेभानाचे ध्यान?


राधे, कासाविशी अशी.. तरी ”वेडी” कशी म्हणू ?
तुझ्या रुपाने पाहिली एक वेडीपिशी वेणू !


राधे, दृष्टीतून का ग घन सावळा थिजला?
इथे तुझ्या डोळा पाणी…तिथे मुरारी भिजला !!


डोळा पाणी.. जिणे उन्ह..इंद्रधनुचा सोहळा
पुसटले साती रंग…एक ” श्रीरंग ” उरला !!


कवी -- संदीप खरे